संस्थेचा ग्राहक हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य स्तरातील असतो. हे समाजातील आर्थिक क्षमता नसलेले समाज उपयोगी काम करून आपला उदर निर्वाह करणारे तळागाळातील छोटे व्यवसाय, धंदा करणारे असतात. अशा जनतेला बचतीची सवय लावुन व्यवहार करायला लावणे व त्यांना कर्जरूपाने अर्थसाहय करणे हे कार्य संस्था करित आहे. संस्थेमुळे केवळ तिच्या सभासदाला नव्हे तर त्याच्या कुटूंबाला, गावालाही अप्रत्यक्ष फायदे मिळत असताना छोट धंदयासाठी व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज बचत गट कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, तातडी कर्ज, मुदत ठेव तारण कर्ज, सोने तारण कर्ज आशा विविध मार्गाने अर्थसाहय देउन समाजातील बेरोगारीच दूर करण्यासाठी तसेच ग्रामिण भागातून शहराकडे निर्वाह करण्यासाठी जाणारा लोंढा सुध्दा रोखण्याकरिता त्यांचे जिवनमान सुधारण्याकरीता, आर्थिक, सामाजिक विकास साधण्याकरिता ज्योती कांती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी ली. , नव नविन स्वप्न घेउन काम करत असते.
© Copyrights & All Rights Reserved. Jyoti Kranti Co-Op Credit Society Ltd.