ज्योती क्रांती बद्दल थोड.......

finance-about

संस्थेविषयी

ज्योती क्रांती बद्दल थोड.......

खाजगी सावकारकी ग्रामीण भागात फोकावली होती. अव्वाच्या सव्वा भावाने व्याजाने रक्कम द्यायचे. व्याजापोटी अनेकांच्या शेतजमिनी गेल्या. संसाराची राख रांगोळी झाली. हे सर्व मनाला अस्वस्थ व हृदयाला स्पर्श करणारे होते. त्यामुळे लोकांसाठी काहीतरी करावे. ही मनात इच्छा होती. त्या इच्छेतून ज्योती क्रांती य संस्थेचा जन्म झाला आहे. काही शिक्षक मित्रांच्या सहकार्याने पहिली Non-Registered पतसंस्था चालवण्यात आली. य संस्थेचे १९९३ ते २००० असे ७ वर्ष कामकाज चालले. या पुढे ५ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची शिक्षकदिनी स्थापना झाली. गावातील विविध जाती व धर्मातील लोकांना सभासद करून घेतले, त्यामुळे संस्थेकडे दोन महिन्यामध्ये ५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ह्या रक्कमेचे पुढे काय करावयाचे हा प्रश्न सर्वाना पडला आणि त्यामधून दुधडेअरी ची स्थापना झाली.

गायी खरीदीसाठी संस्थेने कर्ज पुरवठा केला दुधाच्या पगारातून हफ्ते वसूल झाले. गावात दुधाच्या व्यवसायामुळे शेतकरी शेतमजूर यांच्या हातात पैसा येऊ लागला त्यांना सावकाराची गरज पडली नाही. ज्योती क्रांतीच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्ना पूर्ण झाल्याचा अत्यानंद झाला. शेतकरी बरोबर गावातील दुकानदार, व्यापारी यांना पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज मिळू लागल्यामुळे त्यांच्याही गरजा भागू लागल्या, हे सर्व पाहुन जामखेड तालुकेतील लोक आमच्या गावी ज्योतीक्रांती य संस्थेची शाखा स्थापन करा अशी मागणी करू लागले. त्यामुळे नान्नज, अरणगाव, जामखेड, खर्डा या ठिकाणी पतसंस्थेच्या शाखा स्थापन झाल्या. संस्थेचे कामकाज आज रोजी महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे येथे चालू आहे. संस्थेचे स्वतःचे मोबाईल अॅप आहे.

जामखेड तालुक्यात शाखा स्थापन झाल्याने तालुक्यातील शेतकरी दुध धंद्यासाठी डेअरी सुरु करण्यासाठी आग्रह करू लागले त्यामुळे दुध संघ स्थापन करून तालुक्यातील शेतकरी यांचे दुध संकलन होऊ लागते. जामखेड तालुक्यात अर्थ क्रांती बरोबर धवलक्रांती सुरु झाली.

२०१० साली जामखेड तालुक्याच्या विविध भागातून मागणी होऊ लागल्याने मल्टीस्टेट पतसंस्थेची स्थापना झाली. सुरुवातीस ५ राज्यांचे कार्यक्षेत्र मिळाले आणि आज रोजी ज्योती क्रांती मल्टीस्टेट च्या ४८ शाखामधून १ लाख २८ हजार सभासदांना आपण तत्पर सेवा देत आहोत...

सध्या संस्थेमध्ये २६७ कर्मचारी, १९६ दैनिक ठेव प्रतिनिधी, १०१ बचत गट प्रेरक यांह रोजगार मिळाला आहे . ३८९ बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक लाभ मिळाला आहे.

महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार ची संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यावरण पूर्वक शेतीस उपयोगी अशा प्रकारचा व्यवसाय म्हणून मधु मक्षिकापालन" य व्यवसायाची निवड केली आहे. संस्थेच्या दतीने महिला दिन" ( Women's Day), मातृदिन दिवस (Mother's Day). हळदी कुंकू कार्यक्रम, नवरात्र उत्सव साजरे केले जाते. ज्योती क्रांती या संस्थेच्या वतीने उद्योगमित्र यांच्या वतीने विविध योजनांची माहिती बेरोजगार तरुणांसाठी व महिलांसाठी राबविण्याचा प्रयत्न चालू आहे.

२००० साली लावण्यात आलेले एक छोटेसे अर्थक्रांतीचे रोपटे आज वटवृक्ष्यामध्ये रुपांतर झाले आहे. आज रोजी ज्योती क्रांती को. ऑप. सोसायटी ली. च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात अर्थ सेवा देत आहोत सर्वसामान्यापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत विश्वासाच्या जोरावर आपले एक एक पाउल विश्वासपूर्वक टाकत आहे

ज्योती क्रांतीचे काम करत असताना शिस्त आणि नियमांचे अनुपालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले प्रामाणिक कष्ट आणि सकारात्मक विचार (Positive Thinking) ज्योती क्रांतीचे नावलौकिक करण्यात नेहमी सहकार्य करेल. यात तिळमात्र शंका नाही.

23
वर्षाचा अनुभव

आमचे यश

आमची कामगिरी

  • ५ राज्यांचे कार्यक्षेत्र
  • ४८ शाखा
  • १ लाख २८ हजार सभासद
  • २ लाख समाधानी ग्राहक
  • ५००० बचत गट
  • ६० ग्राहक सेवा केंद्र
  • २६७ कर्मचारी
  • १९६ दैनिक ठेव प्रतिनिधी
  • १०१ बचत गट प्रेरक

ग्राहकांच्या प्रतिक्रिया