finance-about

संस्थेविषयी

ज्योती क्रांती बद्दल थोड.......

खाजगी सावकारकी ग्रामीण भागात फोकावली होती. अव्वाच्या सव्वा भावाने व्याजाने रक्कम द्यायचे. व्याजापोटी अनेकांच्या शेतजमिनी गेल्या. संसाराची राख रांगोळी झाली. हे सर्व मनाला अस्वस्थ व हृदयाला स्पर्श करणारे होते. त्यामुळे लोकांसाठी काहीतरी करावे. ही मनात इच्छा होती. त्या इच्छेतून ज्योती क्रांती य संस्थेचा जन्म झाला आहे. काही शिक्षक मित्रांच्या सहकार्याने पहिली Non-Registered पतसंस्था चालवण्यात आली. य संस्थेचे १९९३ ते २००० असे ७ वर्ष कामकाज चालले. या पुढे ५ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची शिक्षकदिनी स्थापना झाली. गावातील विविध जाती व धर्मातील लोकांना सभासद करून घेतले, त्यामुळे संस्थेकडे दोन महिन्यामध्ये ५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ह्या रक्कमेचे पुढे काय करावयाचे हा प्रश्न सर्वाना पडला आणि त्यामधून दुधडेअरी ची स्थापना झाली.

गायी खरीदीसाठी संस्थेने कर्ज पुरवठा केला दुधाच्या पगारातून हफ्ते वसूल झाले. गावात दुधाच्या व्यवसायामुळे शेतकरी शेतमजूर यांच्या हातात पैसा येऊ लागला त्यांना सावकाराची गरज पडली नाही. ज्योती क्रांतीच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्ना पूर्ण झाल्याचा अत्यानंद झाला. शेतकरी बरोबर गावातील दुकानदार, व्यापारी यांना पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज मिळू लागल्यामुळे त्यांच्याही गरजा भागू लागल्या, हे सर्व पाहुन जामखेड तालुकेतील लोक आमच्या गावी ज्योतीक्रांती य संस्थेची शाखा स्थापन करा अशी मागणी करू लागले.

श्री. अजिनाथ रामभाऊ हजारे
(चेअरमन ज्योती कांती को. ऑप क्रेडीट सोसायटी ली.)

आदिवाणी