खाजगी सावकारकी ग्रामीण भागात फोकावली होती. अव्वाच्या सव्वा भावाने व्याजाने रक्कम द्यायचे. व्याजापोटी अनेकांच्या शेतजमिनी गेल्या. संसाराची राख रांगोळी झाली. हे सर्व मनाला अस्वस्थ व हृदयाला स्पर्श करणारे होते. त्यामुळे लोकांसाठी काहीतरी करावे. ही मनात इच्छा होती. त्या इच्छेतून ज्योती क्रांती य संस्थेचा जन्म झाला आहे. काही शिक्षक मित्रांच्या सहकार्याने पहिली Non-Registered पतसंस्था चालवण्यात आली. य संस्थेचे १९९३ ते २००० असे ७ वर्ष कामकाज चालले. या पुढे ५ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची शिक्षकदिनी स्थापना झाली. गावातील विविध जाती व धर्मातील लोकांना सभासद करून घेतले, त्यामुळे संस्थेकडे दोन महिन्यामध्ये ५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ह्या रक्कमेचे पुढे काय करावयाचे हा प्रश्न सर्वाना पडला आणि त्यामधून दुधडेअरी ची स्थापना झाली.
गायी खरीदीसाठी संस्थेने कर्ज पुरवठा केला दुधाच्या पगारातून हफ्ते वसूल झाले. गावात दुधाच्या व्यवसायामुळे शेतकरी शेतमजूर यांच्या हातात पैसा येऊ लागला त्यांना सावकाराची गरज पडली नाही. ज्योती क्रांतीच्या माध्यमातून पाहिलेलं स्वप्ना पूर्ण झाल्याचा अत्यानंद झाला. शेतकरी बरोबर गावातील दुकानदार, व्यापारी यांना पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज मिळू लागल्यामुळे त्यांच्याही गरजा भागू लागल्या, हे सर्व पाहुन जामखेड तालुकेतील लोक आमच्या गावी ज्योतीक्रांती य संस्थेची शाखा स्थापन करा अशी मागणी करू लागले.
श्री. अजिनाथ रामभाऊ हजारे
(चेअरमन ज्योती कांती को. ऑप क्रेडीट सोसायटी ली.)
ग्राहकाकडील सोनेवस्तु, महत्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज,पैसे, अनमोल वस्तु, सुरक्षित राहाव्यात म्हणून संस्थेने प्रत्येक शाखेमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध केली आहे.
ज्योती क्रांती बॅंकेच्या सर्व शाखा आॅनलाईन संगणक प्रणालीने एकमेकांना जोडलेल्या आहेत.खातेदार कोणत्याही शाखेमधून आपल्या खातेवर व्यवहार करू शकतो .
यामध्ये त्वरीत आपल्या शाखेमधून ऑनलाईन पध्दतीने खातेदाराला कोणत्याही नॅशनलाईज बॅंकेच्या खातेदाराच्या खातेवर 15 मिनीटात पैसे पाठवता येतात.
यामध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल व डीटीएच रिचार्ज,एका खातेवरून दुसऱ्या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, मीनी स्टेटमेंट, बॅलन्स ईन्कवायरी अशा सुविधा घरबसल्या मिळतात.
यामध्ये एका खातेवरून दुसऱ्या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, मीनी स्टेटमेंट, बॅलन्स ईन्कवायरी अशा सुविधा घरबसल्या मिळतात.
कोणत्याही बॅंकांच्या ए.टी.एम कार्डचे पैसे संस्थेच्या प्रत्येक शाखेमधुन खातेदार सहज व विना चार्ज काढु शकतो .तसेच आधार कार्ड मार्फत भारतातील कोणत्याही बॅंकेच्या खातेवर पैसे जमा किंवा नावे करू शकतो .
बँकिंग क्षेत्रातील एसएमएस सेवा ही एक महत्त्वाची सुविधा आहे, ज्याच्यामुळे बँकिंग संबंधित सुचना, खातेची स्थिती, वित्तीय व्यवस्था, व्यापारिक संदेश, आणि इतर महत्त्वाच्या संदेशांची माहिती म्हणजे खातेदारांना एसएमएस द्वारे पाठवता येते. या सेवेच्या माध्यमातून खातेदारांना विविध वित्तीय संचयने, विपत्तीचे सूचन, बॅंकच्या आयोजने आणि अन्य विशिष्ट महत्त्वाच्या सूचनांसाठी संदेश पाठविले जातात.
मर्चंट बँकिंग ही वित्तीय सेवेची एक विशेष श्रेणी आहे ज्याच्या माध्यमातून विभागीय वित्तीय संस्था किंवा व्यापारीच्या आवश्यकतेनुसार विभागीय आणि विशिष्ट सेवांची प्रदान केली जाते. या सेवेच्या माध्यमातून, उद्योजकांना कॅपिटल मोबदल्याच्या व्यवसायिक प्रक्रियेतील मदतीची सुविधा मिळते. या सेवेच्या मुख्य वापरांमध्ये IPO व्यवस्थापन, म्यूच्यूअल फण्ड व्यवस्थापन, प्रायव्हेट इक्विटी, विद्यमान संपत्तीच्या व्यापाराच्या अवलंब आणि वित्तीय सल्लागार समाविष्ट आहे.
© Copyrights & All Rights Reserved. Jyoti Kranti Co-Op Credit Society Ltd.